जागतला सर्वात मोठा हुकुमशाहा हिटलर, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी केली होती आत्महत्या. जर्मनीवर हुकूमशहा म्हणून ज्याने राज्य केले तो म्हणजे ऍडॉल्फ हिटलर. नाझी पक्षाचा नेता म्हणून तो सत्तेवर आला. 29 एप्रिल 1945 या दिवशी ऍडॉल्फ हिटलरने त्याच्या पत्नीसह आत्महत्या केली होती. ऍडॉल्फ हिटलर 1933 ते 1945 पर्यंत जर्मनीचा हुकूमशहा होता. ऍडॉल्फ हिटलरने आपल्या हयातीत साठ लाख ज्यू लोकांना ठार मारले. 1 सप्टेंबर 1939 रोजी पोलंडवर हल्ला करून त्याने दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात केली. हिटलरने त्याची गर्लफ्रेंड ईवा ब्रॉनसोबत लग्नाच्या एका दिवसानंतर 30 एप्रिल रोजी एका बंकरमध्ये आत्महत्या केली. ऍडॉल्फ हिटलरच्या मृत्यूला आज 78 वर्षे पूर्ण झाली आहेत.