लोकांची भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते
काही लोकांना पटकन राग येतो तर काही लोक लगेच इमोशनल होतात.
भावनांवर नियंत्रण ठेवल्यास अनेक समस्या आपोआप सुटतात.
जर तुमच्या भावनांवर तुमचं नियंत्रण नसेल, तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही सोप्या टिप्स फॉलो करुन तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकता.
एक्सरसाईज हे स्ट्रेस बस्टर आहे, असं मानलं जातं.
व्ययाम करुन तुम्ही भावनांवर नियंत्रण आणू शकता.
जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल आणि भावना व्यक्त करता येत नसतील तर तुम्ही गाणी ऐका, डान्स करा आदी गोष्टी करु शकता.
योगा केल्यानं केवळ शरीर नाही तर मन देखील निरोगी राहते, असं देखील म्हटलं जातं.
इमोशन्सवर कंट्रोल आणायचा सर्वात सोपा उपाय म्हणजे मेडिटेशन.
मेडिटेशन करताना माणूस सगळे विचार विसरुन एकाग्र होतो.