लालू प्रसाद यादवांना पाच वर्षांची शिक्षा दिली आहे. तसेच 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. हा घोटाळा139.35 कोटी रुपयांचा आहे. चारा घोटाळा प्रकरणी पाच खटल्यांत त्यांना शिक्षा झाली आहे. लालू प्रसाद यादवांना 2013 साली पाच वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला होता. 1996 साली सीबीआयच्या छापेमारीनंतर पहिल्यांदा चारा घोटाळा समोर. हा घोटाळा जवळपास 950 कोटी रुपयांचा असल्याचं सांगण्यात येतंय.