वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्यामुळे राज्यात सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे गणपतीचं आवडता नैवेद्य म्हणजे मोदक.... दररोज गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. खव्याचे मोदक पुण्याच्या शेफ स्वाती इंगळे यांनी यावेळी नवनवीन प्रयोग करुन मोदक तयार केले आहेत. त्यात रेनबो म्हणजेच सात रंगाचे मोदक सगळ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.