सध्या बहुतेक जण वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत. यापासून सुटका मिळवण्यासाठी काही जण डाएटींग तर काही जण व्यायामाचा उपाय निवडतात.



डाएटींग करताना काही वेळा खूप भूक लागते, क्रेविंग्ज होतात.



भूकेवर नियंत्रण मिळवत तुम्हाला क्रेविंग्जपासून सुटका मिळवायची असेल, तर त्यासाठी सोपा मार्ग आहे.



असे काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्याने शरीरातील कॅलरी वाढत नाही पण भरपूर ऊर्जा मिळते आणि पोट भरलेले राहते. त्यामुळे सारखी भूक लागत नाही.



वजन कमी करण्यासाठी तुमचा आहार सर्वात महत्वाचा आहे. त्यासाठी तुम्ही दिवसभरात जितक्या कॅलरीज सेवन करता, त्याहून अधिक कॅलरीज तुम्ही बर्न करायला हव्यात.



तुम्ही एका दिवसात खूप जास्त कॅलरीज घेत असाल आणि खूप कमी कॅलरीज बर्न करत असाल तर व्यायाम करूनही तुमचं वजन कमी होणार नाही.



तुमचा आहार आणि खाण्याच्या सवयींचा तुमच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. डाएटींग करताना तुम्हाला खूप भूक लागत असेल तर तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवू शकता.



चण्याचा हेल्दी फूडमध्ये समावेश केला जातो. मोड आलेले चणे खाल्ल्यानं शरीराला पुरेसे प्रथिनं आणि फायबर मिळतात. यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही.



भूक लागल्यावर बदाम खा. यामुळे शरीराला व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट, प्रोटीन आणि फायबर मिळतात. प्रोटीन आणि फायबर युक्त पदार्थ खाल्ल्यानं तुमचं पोट भरलेलं राहतं आणि जास्त वेळ भूक लागत नाही.



भाज्यांचा भूक शांत करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. यामुळे शरीराला योग्य पोषण मिळतं. तुम्ही भाज्यांच्या रसामध्ये आळशी बिया मिसळून त्याचंही सेवन करु शकता. भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.