नारळाच्या झाडापासून निर्माण होणाऱ्या सर्वच गोष्टी माणसासाठी फार उपयोगी आहेत.



नारळाचे महत्त्व आणि आरोग्यविषयक फायद्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो.



जागतिक नारळ दिवस हा मुख्यतः आशियाई पॅसिफिक देशांमध्ये साजरा केला जातो.



जगभरात नारळाचे उत्पादन घेतले जाते, पण आग्नेय आशियात त्याचे सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं.



हा दिवस खास बनवण्यासाठी नारळ पाणी, खोबरेल तेल, दूध आणि भुसाला विशेष महत्त्व आहे.



अगदी तहान भागविण्यापासून ते फर्निचर तयार करण्यापर्यंत नारळाचे असंख्य असे फायदे आहेत.



नारळामध्ये कार्बोहायड्रेट्स, मॅगनिज आणि प्रोटिन मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे आपले आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.