माशांच्या चांगल्या वाढीसाठी कृत्रिम अन्नाचा पुरवठा करणे गरजेचे आहे.



माशांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांना प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य खाद्याचा पुरवठा करावा.



प्राणीजन्य अन्नामध्ये सागरी किंवा गोड्या पाण्यातील लहान ताज्या माशांचा समावेश असतो.



कोंबडी किंवा इतर प्राण्यांपासून मिळणारे ताजे मांस टाकले असता,माशांना चांगल प्रथिने मिळतात.



माशांपासून तेल काढल्यानंतर राहिलेले डोके आणि मांस तुकडे माशांना खायला द्यावे.



गांडूळाचे लहान तुकडे करून तलावात टाकवे.



वनस्पतीजन्य खाद्यामध्ये विविध तृणधान्यांचा समावेश असावा, त्यामुळे माशांची वाढ चांगल्या प्रकारे होते.



पाण्यात वनस्पतींची पाने,भाजीपाला देखील माशांसाठी फायदेशीर आहे.



सकाळी तलावात खाद्याचे वाटप करावे.



खाद्य टाकण्याच्या वेळेस संपूर्ण तलावामध्ये न टाकता काही ठराविक ठिकाणीच टाकावे, त्यामुळे सर्व माशांना खाद्य मिळण्यास मदत होते.



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.