बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची पत्नी गौरी खानवर गुन्हा दाखल झाला आहे.
लखनौच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात 409 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत राहणाऱ्या किरीट जयवंत शहा यांनी गौरीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गौरी खान तुलसियानी कन्स्ट्रक्शन अॅन्ड डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीची ब्रँड अॅंबेसेडर आहे.
मुंबईत राहणाऱ्या किरीट शहा या व्यक्तीने तुलसियानी कन्स्ट्रक्शन अंतर्गत लखनौमध्ये 86 लाखांचा एक फ्लॅट विकत घेतला होता.
गौरी खान तुलसियानी कन्स्ट्रक्शन अॅन्ड डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीची ब्रँड अॅंबेसेडर असून तिच्या जाहिरातीने प्रभावित होऊन फ्लॅट घेतला असल्याचा दावा किरीट यांनी केला आहे.
किरीट यांची आता फसवणूक झाल्याने तुलसियानी कन्स्ट्रक्शन्सची ब्रँड अॅंबेसेडर गौरी खानवर त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.
गौरी खानने अद्याप गुन्हा दाखल प्रकरणी भाष्य केलेलं नाही.
गौरीने नुकतीच मर्सिडीज बेंजची नवीन गाडी विकत घेतली आहे.
गौरी तिच्या स्टायलिश लुकसह फॅशन सेन्समुळे अनेकदा चर्चेत असते.