उपाय 1

1 चमचा बडीशेप, 2 चमचे ओटमील आणि थोडे उकळलेले पाणी यांची एकत्र पेस्ट करा.

ही पेस्ट 15-20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा, त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

या फेस मास्कमुळे तुमचा चेहरा स्वच्छ आणि तजेलदार होईल.

उपाय 2

1 चमचा बडीशेप आणि गरम पाणी घ्यावे आणि त्यामध्ये बडीशेपचे तेल घालावे. याचा वापर तुम्ही टोनर म्हणून करु शकता.

या बडीशेपच्या टोनरमुळे चेहऱ्याच्या समस्या दूर होतील आणि त्वचा निरोगी राहील.

उपाय 3

डोळ्यांच्या त्वचेसाठी बडीशेप गुणकारी आहे.

बडीशेपची पावडर थंड पाण्यात मिक्स करुन त्या पाण्याच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवाव्यात.

असे केल्यास डोळ्यांचा थकवा दूर होतो आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.

उपाय 4

बडीशेपच्या पाण्याने आपण स्टीम फेशियलही करु शकतो.

एका भांड्यात पाणी आणि 1 चमचा बडीशेप घालून एकत्र करून उकळून घ्या.

या पाण्याची चेहऱ्यावर वाफ घ्या, त्यानंतर चेहरा स्वच्छ पुसून घ्या,यामुळे चेहऱ्याची छिद्र मोकळी होतात.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.