'फादर्स डे' ची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. सर्वात आधी पितृदिन 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. वॉशिंग्टन च्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड ने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. या दिवशी वडिलांना शुभेच्छा आणि वेगवेगळ्या भेटवस्तू देखील दिल्या जातात. हा एक असा दिवस आहे जो आपल्या मुलांप्रती वडिलांचे असलेले प्रेम, आदर आणि शिकवणीची तसेच त्यागाची आठवण करून देतो. जगाच्या अनेक भागांत 'फादर्स डे' हा सुट्टीचा दिवस मानला जात असला तरी भारतात मात्र हा दिवस तितक्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नाही. मात्र, या दिवशी आपल्या वडिलांना भेटवस्तू देऊन त्यांना वेळ देऊन त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त केले जाते.