जूनचा काळ म्हणजे बाजारात जांभळं मिळतातंच. जांभूळ म्हणजे जंगली फळ.



जांभळाचा मोठा फायदा हा मधुमेहाच्या आजारात होतो.



जांभळामध्ये असलेल्या मधुमेहविरोधी गुणधर्मांमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते.



जांभळामुळे रक्तातील स्टार्च आणि साखरेचं रुपांतर ऊर्जेमध्ये होतं.



जांभूळाच्या फळासोबतच जांभळाच्या बियांची पावडर, जांभळाच्या झाडाची साल, जांभळाचा रस याचाही मधुमेहावर उपचार करताना चांगला उपयोग होतो.



जांभूळात अ‍ॅस्ट्रीजेण्ट असल्यानं जांभूळ खाल्ल्यानं त्वचा चांगली राहते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.