अभिनेत्री अमायरा दस्तूरने नुकतीच Pinkvilla Style Icon पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी अमायराचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.



ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. अमायराचा या लूकमधील फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.



काळ्या रंगाच्या स्टायलिश आउटफिटसह अमायराने गळ्यात हिऱ्याचा हार घातला, जो तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.



यासोबतच अमायराने हिऱ्याचे इअररिंग्स आणि ब्रेसलेटही परिधान केलं. तिनं हाय पोनी हेअर स्टाइलने लूक पूर्ण केला आहे.



अमायरा दस्तूर ही बॉलिवूडच्या सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे.



अमायरा तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते.



सोशल मीडियावरही अमायरा चाहत्यांसोबत तिचे सुंदर लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.



अमायरा ट्रेडिशनल, एथनिक, वेस्टर्नसह बिकनी अशा सर्व प्रकारच्या स्टाईल फॉलो करते.



अमायरा अलिकडेच 'प्रस्थानम', 'मेंटल है क्या' आणि 'मेड इन चायना' या चित्रपटांमध्ये झळकली होती.



अमायराने अल्पावधीतच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.