केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर शेतकरी नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांची निराशा करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांची निराशाच केली, शेतकऱ्यांना आधारभावाचे संरक्षण देण्यासाठी अपेक्षित तरतूद नाही : डॉ. अजित नवले



मागच्या वर्षी हमाभावाने किती शेतमालाची खरेदी केली हे सरकारनं का सांगितलं नाही? राकेश टिकैत यांचा सवाल



हा अर्थसंकल्प शेतीला अधोगतीकडे घेऊन जाणारा, अनिल घनवट यांची अर्थसंकल्पावर टीका



शेतकऱ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प, सदाभाऊ खोत यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत



अर्थसंकल्पात मूळ गोष्टींवर भर देण्याऐवजी हवेतल्या घोषणा: संदीप जगताप