अनन्या पांडेची गणना अशा बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये केली जाते, ज्यांनी फार कमी वेळात इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनन्या पांडे नेहमीच तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. चाहतेही तिच्या ड्रेसिंग सेन्सचे खूप कौतुक करतात. अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसते आणि तिचे फोटो व्हिडीओ शेअर करण्याची एकही संधी सोडत नाही. आता नुकतेच अनन्या पांडेने तिचे नवे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत आहे. अनन्या पांडेने गुलाबी शॉर्ट ड्रेसवर ऑरेंज जॅकेट परिधान आहे. हाय हिल्सनी तिच्या लुकमध्ये आणखी भर घातली आहे. पडद्यावर स्टायलिश आणि सिझलिंग दिसणारी अनन्या पांडे खऱ्या आयुष्यातही खूप ग्लॅमरस आहे.