अभिनेता फरहान अख्तर हा जगभरातील विविध शहरांमध्ये आपल्या बँडसोबत परफॉर्म करतो.



काही दिवसांपूर्वी 'फरहान लाईव्ह' या फरहानच्या बँडच्या लाईव्ह प्रोग्रॅमचे आयोजन ऑस्ट्रेलियामधील सिडनी आणि मेलबर्न येथे करण्यात आले होते.



ऑस्ट्रेलियामधील हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. फरहानने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माहिती दिली.



फरहानने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, अनपेक्षित परिस्थितीमुळे आमच्या 'फरहान लाईव्ह' बँडला ऑस्ट्रेलिया दौरा रद्द करावा लागला. '



'आम्ही या वीकेंडला सिडनी आणि मेलबर्नमध्ये येऊन परफॉर्म करु शकत नाही. यामुळे आम्ही निराश झालो आहोत. पण या सुंदर देशाला आम्ही नंतर भेट देऊ आणि तिथे परफॉर्म देखील करु.' असंही त्यानं पोस्टमध्ये लिहिलं.



काही दिवसांपूर्वी फरहानच्या 'फरहान लाईव्ह' या बँडने पुण्यामध्ये परफॉर्म केलं. 'फरहान लाईव्ह' या बँडच्या लाइव्ह परफॉर्मन्सचं आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलं.



फरहानची ही पोस्ट पाहून काही नेटकरी भडकले आहे. त्याच्या या पोस्टला काही युझर्सनं कमेंट केली. एका नेटकऱ्यानं फरहानच्या पोस्टला कमेंट केली, 'आमचे पैसे परत दे.'



दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'आम्हाला रिफंड कुठे मिळेल?'



'रॉक ऑन', 'रॉक ऑन 2' या चित्रपटामध्ये फरहानने रॉक स्टारची भूमिका साकारली.



फरहान हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. दिल धडकने दो, जिंदगी मिलेगी ना दोबारा यांसारख्या चित्रपटांमधील फरहानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.