अभिनेत्री करीना कपूर ही सध्या तिच्या कुटुंबासोबत लंडन ट्रिप एन्जोय करत आहे.



करीना ही पती सैफ अली खान आणि तैमुर, जेह या तिच्या मुलांसोबत लंडनमध्ये ट्रिपला गेली आहे.



करीना सोशल मीडियावर लंडन ट्रिपचे फोटो शेअर करत आहे. करीना आणि सैफचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



फोटोमुळे आता करीना ही तिसऱ्यांदा आई होणार आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.



व्हायरल फोटो मध्ये करीना ही ब्लॅक कलरचा टँग टॉप, हातात कप आणि स्लिंग बॅग,न्यूड मेक-अप अशा लूकमध्ये करीना दिसत आहे. या फोटोमध्ये सैफ देखील दिसत आहे.



फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'करीना प्रेग्नंट आहे का?'



व्हायरल फोटो करीना आणि सैफ यांच्या लंडन ट्रिपचा आहे? की जुना आहे? याबाबात अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.



करीना आणि सैफनं 2012 साली लग्नगाठ बांधली.



करीना कपूरचा लाल सिंह चढ्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.



. करीनासोबत अभिनेता आमिर खान हा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.