अलीकडच्या काळात वाढत्या वाहनांमुळे, कारखान्यांमुळे हवा प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. सर्वांनाच माहितीये की, आरोग्यासाठी दूषित हवा किती घातक असते. वायू प्रदूषणामुळे रसायने, कण किंवा जैविक पदार्थांचा वातावरणात समावेश होतो. ज्यामुळे मानव व इतर प्राण्यांना किंवा पर्यावरणाला हानी पोहोचते. विश्व स्वास्थ्य संगठन नुसार वायुप्रदूषणामुळे दरवर्षी 7 दशलक्ष लोकांचा अकाली मृत्यू होतो असे सिद्ध झाले आहे. तज्ज्ञाच्या माहितीनुसार असे समोर आले की, वायू प्रदूषणामुळे पार्किन्सन्स या रोगांचा धोका वाढत आहे. वायू प्रदूषणामुळे आतड्याची जळजळ आणि अल्फा सिन्यूक्लिनचे स्थानिक संचय देखील होऊ शकते पार्किन्सन रोग हा मेंदूचा विकार आहे. ज्यामुळे अनपेक्षित किंवा अनियंत्रित हालचाली होतात. जसे की थरथरणे, कडक होणे आणि संतुलन आणि समन्वय राखण्यात अडचण येणे. या सारख्या समस्या या आजारात दिसून येतात.