हिवाळ्याचा दिवसात लोक सहसा आल्याचा चहा किंवा काढा पितात. आलं उष्ण असल्याने त्याचे सेवन केल्यास थंडीचा त्रास कमी होतो. पण तुम्हला माहितीये का? आल्याचे अति सेवन हे शरीरासाठी किती घातक ठरू शकते. जाणून घ्या आल्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरिराला कोणता धोका होऊ शकतो. 1) पोटात जळजळ होणे: आलं शरीराला ऊब देत असले तरी त्याचे जास्त सेवन केल्यास पोटात जळजळ होऊ शकते. आल्याचे अति सेवन केल्यास अॅसिड तयार होणे, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. 2) रक्तस्त्रावांवर परिणाम होतो: आल्यामध्ये असे गुणधर्म असतात ज्यामुळे त्याचे अति सेवन केल्यास रक्तस्त्रावांवर परिणाम होऊ शकतो. 3) रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते अन्नामध्ये असल्याचा जास्त समावेश केल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते. हे धोके टाळण्यासाठी शक्य असल्यास आल्याचे सेवन कमी प्रमाणात करावे.