मासिक पाळी दरम्यान काही पदार्थ महिलांना वेदनांपासून आराम देवू शकतात. तर काही पदार्थांमुळे वेदना वाढू ही शकता. पपई हे असे फळ आहे जे मासिक पाळी दरम्यान खण्यास बऱ्याच स्त्रियांचा गोंधळ होतो. तुमचाही गोंधळ होत असेल तर जाणून घ्या मासिक पाळी दरम्यान पपई खाण्याचे काय फायदे आहेत. तज्ञांच्या मते मासिक पाळी दरम्यान पिकलेली पपई खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण कच्ची पपई चुकूनही खाऊ नका. मासिक पाळी दरम्यान पपई खाल्यास रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. पपईचे सेवन केल्याने गर्भाशयाच्या स्नायूंना रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते. पपईचे नियमित सेवण केल्याने गर्भाशयाचे स्नायू संकुचित होण्यास मदत होते. तसेच पपई शरीरातील इस्ट्रोजन हार्मोनची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते.