बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री म्हणून ईशा गुप्ताला ओळखले जाते ईशा सध्या ‘आश्रम 3’ वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरिजमध्ये ती बोल्ड लूकमध्ये दिसणार आहे. सीरिज प्रदर्शित होण्यापूर्वीच तिने बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी अधिक पसंती दिली आहे. ईशा बोल्ड अन् ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ‘आश्रम’ सीरिजनिमित्त पुन्हा एकदा ईशा नव्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सीरिजबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. बॉबी देओलची मुख्य भूमिका असणाऱ्या या सीरिजमध्ये ईशा महत्वाच्या भूमिकेत आहे. ईशाचा हॉट अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.