अभिनेत्री एरिका फर्नांडिस म्हणजेच छोट्या पडद्यावरील 'प्रेरणा'. एरिका फर्नांडिस 'कसौटी जिंदगी की' मालिकेतील 'प्रेरणा' या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली. अभिनेत्री एरिका फर्नांडिसने नवं फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. यामध्ये एरिकाचा इंडो-वेस्टर्न लूक पाहायला मिळाला आहे. लाईट ग्रीन रंगाच्या साडीमध्ये एरिका फारच सुंदर दिसत आहे. एरिकाने स्ट्रॅपलेस ब्लाऊज आणि पर्ल ज्वेलरीसोबत हा स्टायलिश लूक पूर्ण केला आहे. या लूकला पूर्ण करण्यासाठी केलेली एरिकाने बन हेअरस्टाईल आणि मोठे इअररिंग्स घातले आहेत. या स्टायलिश लूकला एरिकाने उत्तमरित्या कॅरी केलं आहे. एरिका फर्नांडिस सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करते. अभिनेत्रीसह एरिका फर्नांडिस एक मॉडेल आहे. एरिका फर्नांडिसने अनेक ब्युटी पेजंटमध्ये भाग घेतला आहे.