इंडस्ट्रीला रामराम ठोकणारी अभिनेत्री म्हणजेच शमा सिकंदर अभिनेत्री शमा सिकंदरचा जन्म 4 ऑगस्ट 1981 रोजी राजस्थानमध्ये झाला. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी शमा मुंबईत आली. शमा सिकंदर सध्या 42 वर्षांची आहे. शमाने छोट्या पडद्यावर अभिनय करून तिच्या करिअरची सुरुवात केली. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत शमाने ती डिप्रेशनमधून जात होती त्या वेळेबद्दल खुलासा केला. शमा सिकंदरने उघड केले की ती टीव्हीवर परत येण्यास उत्सुक नाही. शमाने टीव्ही सोडला आणि ओटीटीमध्ये प्रवेश केला. तिने विक्रम भट्टच्या वेब ओरिजिनल 'माया'मधून पदार्पण केले. शमा सिकंदरचे इन्स्टाग्रामवर 3.2 M फॉलोअर्स आहेत.