ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटाला अलिकडे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 याने गौरवण्यात आलं आहे. यानंतर देशभरातील चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा कांतारा फिवर दिसत आहे. कांतारा चित्रपटापासून प्रेरणा घेत एका मंडळाने भुता कोला-थीमची बाप्पाची मूर्ती बनवली आहे. नवी मुंबईतील एका गणेश मंडळाने 'कांतारा' फेम पंजुर्ली दैवाच्या भूता-कोला रुपातील मूर्ती बनवली आहे. 'कोपरखैरणेचा एकदंत' या मंडळाची ही आकर्षक मूर्ती आहे. या मूर्तीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फक्त यंदाच नाही तर गेल्या वर्षी 2023 मध्येही गणेशोत्सवात कांतारा चित्रपटाचा ट्रेंड दिसून आला होता. नवी मुंबईतील कौपरखैरणे येथील गणेशोत्सव मंडळाने यंदा 'कांतारा' गणेशमूर्तीचं स्वागत केलं आहे. पांजुर्ली दैवावर आधारित या गणेशमूर्तींची थीम आणि सजावट करण्यात आली आहे. या चित्रपटाने भारतातील छोट्याशा गावातील कथा आणि प्रथा जगासमोर आणली आहे. कांतारा चित्रपटामुळे भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीची जागतिक पातळीवर ओळख झाली आहे.