अनेक भारतीयांनी या वर्षी राष्ट्रीय स्तरावर वर्चस्व गाजवलं. यामुळेच Google ने 2024 या वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या टॉप 10 भारतायांची यादी जाहीर केली आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexel

विनेश फोगाट

विनेश फोगाट एक प्रसिद्ध कुस्तीपटू आहे, जिने वजनाच्या समस्यांमुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवून बरेच लक्ष वेधून घेतले.

Image Source: pexel

नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या चतुर राजकीय खेळीमुळे चर्चेत आले.

Image Source: pexel

चिराग पासवान

बिहारमधील सक्रिय राजकारणी आणि लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी चर्चेचा विषय ठरले.

Image Source: pexel

हार्दिक पांड्या

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याने T20 विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या कामगिरीमुळे तो चर्चेत आला.

Image Source: pexel

पवन कल्याण

तेलुगू अभिनेता आणि राजकारणी पवन कल्याण आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री बनला. अभिनेता असल्यामुळे त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. आता तो एका नवीन रुपात जनतेची सेवा करत आहे.

Image Source: pexel

शशांक सिंह

क्रिकेटपटू शशांक सिंहने आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जसह 14 सामन्यांमध्ये 354 धावा केल्या.

Image Source: pexel

पूनम पांडे

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे तिच्या पब्लिसिटी स्टंटसाठी ओळखली जाते आणि सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

Image Source: pexel

राधिका मर्चंट

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचं राधिका मर्चंटसोबत यावर्षी लग्न झालं. यामुळे ती प्रकाशझोतात आली.

Image Source: pexel

अभिषेक शर्मा

क्रिकेटपटू अभिषेक शर्मा भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीमुळे प्रसिद्ध झाला.

Image Source: pexel

लक्ष्य सेन

या बॅडमिंटनपटूने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून भारतीयांचा मान उंचावला.

Image Source: pexel