यंदा लग्नसराईच्या मोसमात व्यवस्थेपासून बजेटपर्यंत अनेक नवे ट्रेंड पाहायला मिळत आहेत.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexel

सर्वेक्षणात असे आढळून आले की 2024 मध्ये एक तृतीयांश जोडपे ऑनलाइन ॲप्सच्या मदतीने, तर 32 टक्के लग्न जुळणी करणाऱ्यांच्या किंवा नातेवाईकांच्या मदतीने भेटले.

Image Source: pexel

या सीझनच्या अनोख्या वेडिंग ट्रेंड म्हणजे लग्नाआधी 90 सेकंदांचा 'पोस्ट वेडिंग सोशल मीडिया सिझल रील' जोरदार ट्रेंडमध्ये आहे.

Image Source: pexel

लग्नपत्रिका वाटपाच्या पद्धतीतही बदल करण्यात आला आहे. सुमारे 46 टक्के जोडप्यांनी ऑनलाईन पद्धतीने पत्रिका पाठवत लोकांना लग्नासाठी आमंत्रित केलं.

Image Source: pexel

जेन-झेड विवाहसोहळ्यांमध्ये पाहुण्यांसाठी काही खास उपक्रम ठेवण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे.

Image Source: pexel

सजावटीच्या कल्पनांमध्ये, काही जोडप्यांना लग्नात प्लास्टिक फ्री डेकोरेशन आवडतं, तर काही कपल्स पुन्हा वापरता येण्याजोग्या सजावटीला प्राधान्य देतात.

Image Source: pexel

लग्नाचं बजेटही बदललं आहे. मोठ्या शहरांमध्ये लग्नाचं सरासरी बजेट 36.5 लाख रुपये, तर डेस्टिनेशन वेडिंगचा खर्च सुमारे 51 लाख रुपये आहे.

Image Source: pexel

लग्नाच्या खर्चाच्या वाटणीचा विचार केला तर, 30 टक्के खर्च पालकांनी उचलला, तर 70 टक्के खर्च वधू-वरांनी स्वतः केला.

Image Source: pexel

हनिमून डेस्टिनेशनमध्ये, या वर्षीही नवविवाहित जोडप्यांची पहिली पसंती आंतरराष्ट्रीय ठिकाणे, विशेषत: थायलंडसारख्या आशियाई देशांना आहे.

Image Source: pexel

या हंगामात लग्नाचे सरासरी वय 28 होते, तर 56 टक्के वधूंनी लग्नाच्या निर्णयात मोठी भूमिका बजावली.

Image Source: pexel