विक्की-कतरिनानं 9 डिसेंबर 2021 रोजी थाटामाटात लग्न केलं.
पण, तुम्हाला माहितीय का? विक्की कतरिनाचं सूत नेमकं कसं जुळलं?
मनमर्जियां चित्रपटाचा प्रोमो पाहिल्यानंतर कतरिना विक्कीवर भाळली होती.
कतरिनानं तिची खास मैत्रीण झोया अख्तरला तिच्या भावना सांगितलेल्या.
त्यानंतर, एका अवॉर्ड शोमध्ये विक्कीनं कतरिनाला गंमतीनं लग्नासाठी प्रपोज केलं होतं.
आजवर, विक्की आणि कतरिनानं कधीही त्यांच्या लव्हस्टोरीबाबत उघडपणे भाष्य केलेलं नाही.
दोघांनीही तब्बल दोन वर्ष आपलं अफेअर जगापासून दूर लपवून ठेवलं.
तसं पाहिलं तर, 2021 च्या सुरुवातीपासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या, मात्र दोघांनी मौन बाळगले होते.
नोव्हेंबरच्या शेवटच्या महिन्यात त्यांच्या लग्नाच्या बातम्या आणि काही फोटो व्हायरल झाले.
नंतर, विक्की-कतरिनाच्या लग्नाचे फोटो 9 डिसेंबर 2021 रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाले.
चाहते आणि सेलिब्रिटींनी त्यांचं अभिनंदन केलं.