उभे राहून झोपण्याची कला आजुबाजूचं वातावरणामुळे आणि परिस्थितीमुळे काही प्राण्यांमध्ये विकसित झाली आहे.
उभे झोपणारे प्राणी हे स्टे ॲपरेटस वापरतात, ज्यामुळे प्राणी त्यांचे सांधे लॉक होतात. यामुळे त्यांना उभे राहून झोपणे अधिक सोईस्कर असते आणि विश्रांती घेता येते.
या झोपेला REM झोप असेही म्हणतात.
घोडे उभ्या-उभ्या झोपतात.
गाईसुद्धा उभे राहून झोपू शकतात.
हत्तींच्या वजनामुळे उभे राहून झोपणे त्यांच्यासाठी अधिक सोईस्कर ठरते आणि ते कधी-कधी उभे राहुन डुलकी घेतात. हत्ती उभे राहून कमी वेळेत गाढ झोप घेतात.
जिराफ हे कमी वेळेत झोप घेण्यासाठी उभे राहून झोपतात. आणि शिकार्यापासून शिकार होऊ नये म्हणून उभी झोप घेतात. उभे राहून झोपणे त्यांचा साठी फायदेशीर ठरते.
फ्लेमिंगो हे उभे राहण्यासाठी आणि झोपण्यासाठी एक पाय सुद्धा वापरतात. फ्लेमिंगो हे त्याच्या सांध्यातील घट्ट (लॉकिंग) यंत्रणामुळे ते सहज एका पायावर आराम किंवा उभे राहून झोप घेऊ शकतात.
शिकार होण्यापासून आणि सावध राहण्यासाठी झेब्रा हे सर्व मिळून एकत्र उभे झोपतात.