संन्यास घेणे हे मानसिक आणि शारीरिकरित्या अत्यंत कठीण आहे.
ग्लॅमरच्या दुनियेत प्रसिध्द असलेल्या अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या मोहक जीवनाला मागे टाकून संन्यासी जीवन स्वीकारला आहे.
या प्रवासात प्रमुख अभिनेत्रींची नावे आहेत.
ज्यांनी संन्यासाचा मार्ग स्वीकारून त्यांचा चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
नीता मेहता यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपली छाप सोडलेली आहे. त्यांनी संसाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला आहे.
‘अनुपमा’ या लोकप्रिय धारावाहीक मधून घराघरात पोहोचलेली अनघा भोसलेंनी ग्लॅमरची दुनिया सोडून अध्यात्मिक जीवनाचा मार्ग स्वीकारला आणि नवीन जीवन सुरू केले.
‘भूत’ चित्रपटामधील अभिनेत्री बरखा मदानने फिल्म इंडस्ट्री सोडून बौद्ध धर्म स्वीकारुन बौद्ध भिक्खूनी आयुष्य जगत आहे.
नव्वदच्या दशकातील सुंदर अभिनेत्री ममता कुलकर्णीने ग्लॅमर इंडस्ट्री सोडून संन्यासी मार्ग स्वीकारला. सुमारे 13 वर्षे त्यांनी कठोर तपश्चर्या केली आहे.
‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये आपले नाव कोरणारी अभिनेत्री इशिका तनेजाने ही तिच्या यशस्वी करिअरला मागे टाकून संन्यास स्वीकारला.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.