सोल सर्फर हा चित्रपट प्रेरणादायक कहाणी दर्शवितो. एक व्यावसायिक सर्फर जी शार्कच्या हल्ल्यामुळे तिचा हाथ गमावते आणि सर्व परिस्थितीवर मात करून परत समुद्रात जाण्याचा निर्णय घेते.
2010 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अप्रतिम ठरला होता. एक व्यक्ती पर्वताभोवती कॅन्योन हायकिंग करत असताना एका मोठ्या खडकाच्या खाली अडकतो. त्या खडकांमधून बाहेर पडण्यासाठी तो प्रयत्न करत असतो आणि खडकामधून सुटका करण्यासाठी वेगवेगळ्या रणनीती वापरतो.
3 इडियट्स चित्रपट हा तीन मित्रांची आणि विद्यार्थ्यांची कहाणी सांगतो आणि विद्यार्थ्यांना मनापासून जगण्यासाठी प्रेरित करतो.
हा चित्रपट मुंबईमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलावर आधारित आहे. त्या मुलाच्या लहानपणीचा जीवन प्रवास या चित्रपटामध्ये दाखविले आहे.
एका तरुणाची सुंदर मनमोहक कथा आहे. तरुण आपल्या जीवनात आश्चर्यकारक शोध लावतो. हा तरुण हुशार आणि देखणासुद्धा असतो. पण गर्विष्ठ असल्या कारणामुळे तो एक मोठ्या संकटात सापडतो.
वडील आणि मुलाची कहाणी सांगणारा चित्रपट आहे. वडील एका कंपनीत बिनपगारी इंटर्नशिप सेल्समनची नोकरी करत असतात. हा व्यक्ती त्याच्या आयुष्याची संपूर्ण कमाईची व्यवसायात गुंतवतो आणि अपयशी ठरतो. यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून जाते. यासर्व परिस्थितीमध्ये त्याचा मुलगा फक्त त्याच्यासोबत असतो.
हा चित्रपट 1950 ते 1970 मधील कहाणी दर्शिवतो. 75 % IQ असलेला अलाबामा हा व्यक्ती त्याच्या बालपणाच्या आठवणींमध्ये पुन्हा जाण्यास नाखूष असतो.