'तारक मेहता का उल्टा चष्मा'या लोकप्रिय मालिकेतील सोढी अर्थात गुरुचरण सिंह गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होता.
पण आता 25 दिवसांनी तो सुखरुप घरी परतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता बेपत्ता असल्याचं समोर आलं होतं.
अभिनेत्याच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
गुरुचरण बेपत्ता असल्याने चाहत्यांसह पोलीसदेखील हैराण झाले होते.
गुरुचरणचं बरंवाईट तर झालं नसेल ना असाही विचार चाहत्यांच्या मनात येऊन गेला
घरी परतल्यानंतर पोलिसांच्या चौकशीदरम्यान गुरुचरण म्हणाला,दुनियादारी सोडून धार्मिक यात्रेला गेलो होतो.
अनेक दिवस मी अमृतसरमध्ये थांबलो होतो. त्यानंतर लुधियानासारख्या अनेक शहरांमधील गुरुद्वारमध्ये थांबलो.
त्यानंतर पुन्हा आपल्या वडिलांकडे जावं, असं मला वाटलं. त्यामुळे मी पुन्हा घरी येण्याचा निर्णय घेतला.
गुरुचरणी पोलीस सध्या चौकशी करत आहेत.