बिग बजेट आणि बहुप्रतिक्षित दाक्षिणात्या चित्रपटांनी चाहत्यांची मने जिंकली.
मात्र, काही चित्रपट असे होते जे अपेक्षेप्रमाणे कमाई करु शकले नाहीत.
या वर्षी काही साऊथ चित्रपटांनी प्रेक्षकांची निराशा केली.
हे साऊथ चित्रपट थिएटरमध्ये 'फ्लॉप' नव्हे तर 'सूपरफ्लॉप' ठरले.
300 कोटींच्या बिग बजेटमध्ये तयार झालेला देवरा पार्ट 1 चित्रपट केवळ 292.03 कोटींचा गल्ला जमवण्यात यशस्वी ठरला.
कमल हसन यांचा हा बहुप्रतिक्षित इंडियन 2 चित्रपट 250 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला होता. मात्र चित्रपटाने फक्त 81.32 कोटींची कमाई केली आणि तो बॉक्स ऑफिसवर डिजास्टर ठरला.
सुपरस्टार रजनीकांत यांच्या वेट्टीयन या चित्रपटाकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा होत्या. 160 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात फक्त 146.81 कोटींची कमाई केली.
चियान विक्रम यांचा थंगलान हा चित्रपट देखील खूप चर्चेत होता. 135 कोटींच्या बजेटमधील या चित्रपटाने केवळ 45 कोटींचीच कमाई केली आणि बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.
या चित्रपटासाठी 350 कोटींचे बजेट खर्च करण्यात आले होते. मात्र, कंगुवा फक्त 70.02 कोटींचीच कमाई करू शकला आणि प्रचंड सूपरफ्लॉप ठरला.