साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केलीय.
अभिनेता अल्लू अर्जूनचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने पुष्पा 2 च्या प्रीमियरसाठी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये हजेरी लावली होती
या वेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली.
यावेळी गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला.चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
या प्रकरणात अल्लू अर्जूनवर मृत महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 आणि 118 अंतर्गत चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता.
अधिकची लोकप्रियता अंगाशी आली आणि डॅशिग सुपरस्टार अल्लू अर्जूला अटक झालीय.