श्वेता तिवारी आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते.

त्यासोबतच ती आपली मुलगी पलक तिवारीच्या लव्ह लाईफमुळेही लाईमलाईटमध्ये असते.

श्वेता तिवारी सिंगल मदर आहे आणि ती स्वतः आपल्या मुलांचं पालन-पोषण करते.

श्वेता तिवारी आपल्या मुलांच्या बाबतीत फारच स्ट्रिक्ट आहे, असं आम्ही नाही तिची मुलं स्वतःच सांगतात.

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीनं स्वतः याबाबत खुलासा केला होता.

एका मुलाखतीत पलक तिवारी म्हणाली होती की, आई कुठेच एक्स्ट्रा पैसे खर्च करू देत नाही.

सर्वांना असंच वाटतं की, ती 'कूल मॉम' आहे आणि खरंच ती आहे, असं पलक म्हणाली.

पलक पुढे बोलताना असंही म्हणाली की, ती एकदम टिपिकल देसी आँटी आहे.

नेहमी म्हणत असते की, माझ्याकडे पैसे नाहीत, जा जाऊन स्वतःचे पैसे घेऊन ये, असं पलकनं सांगितलं.

श्वेता तिवारी एक सिंगल मदर असून तिला दोन मुलं आहेत.

पलक तिवारी 24 वर्षांची आहे, तर तिचा भाऊ 9 वर्षांचा आहे.