इंडियाज गॉट लॅटेन्ट या शोमध्ये अरुणाचल प्रदेशमधील एका मुलीने सहभाग घेतला होता.
या मुलीचे नाव जेस्सी नवाम असे आहे. या मुलीने शोमध्ये अरुणाचल प्रदेशबाबत आक्षेपार्ह विधानं केल्याचा दावा पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे.
जेस्सी नवाम हिने विनोदाचा भाग म्हणून अरुणाचल प्रदेशबाबत काही टिप्पणी केली होती. त्या विनोदामुळे शोमध्ये चांगलाच हशा पिकला होता.
त्यानंतर समय रैनाने त्या मुलीला सध्या कुत्र्याचे मांस खाल्ले आहेस का? असे विचारले. या प्रश्नाचे उत्तर म्हमून मी तर अद्याप खाल्लेले नाही. मात्र अरुणाचल प्रदेशचे लोक कुत्र्याचे मांस खातात, असे विधान केले.
विशेष म्हणजे या तरुणीने आपल्या मित्रांचा उल्लेख करत ते कुत्र्याचे मांस खातात, असेही सांगितले. तिच्या याच विधानावर आता आक्षेप घेतला जात आहे.
समय रैनाचा हा शो यूट्यूबवर आल्यानंतर अरुणाचल प्रदेशच्या लोकांनी नाराजी जाहीर केली आहे.
अरुणाचल प्रदेशमधील अरमान राम वेली बाखा नावाच्या एका व्यक्तीने तर थेट पोलिसात तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केला आहे.
या तक्रारीनुसार जेस्सी नवाम हिने अरुणाचल प्रदेशच्या मूलनिवासींबाबत अपमानास्पद टिप्पणी केली आहे.
तक्रारदाराने आपल्या तक्रारीत जेस्सी नवाम यांनी जे केलंय, ते भविष्यात कोणीही करू नये यासाठी या प्रकरणावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.