बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता.



त्यानंतर आता सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचं माहिती समोर येत आहे.



त्याप्रकरणी मुंबईच्या साऊथ सायबर पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.



त्याचसंदर्भात सायबर पोलिसांनी 506 (2) भादवी कलमांसह 66 (ड) आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजस्थानला एक पथक तपासासाठी पाठवले होते.



गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात बनवारीलाल गुज्जर याला राजस्थानमधून अटक केली आहे.



14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता.



या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली.



या घटनेच्या 72 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.



या घटनेच्या 72 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.