तन्वीने समुद्र किनारी केलं फोटोशूट. 'Sunshine Soul' असं कॅप्शन देऊन तिने तिचे सुंदर फोटो पोस्ट केले. 'भाग्य दिले तू मला' या मालिकेमधील तिचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस पडत होता. या मालिकेच्या माध्यमातून ती सर्वांच्या घराघरांत पोहोचली. तिने तिच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेत. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य खूप खुलून दिसतंय. तन्वी सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.