मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा ‘हंटर’ हा चित्रपट ४ एप्रिल २०२५ रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

सई सध्या सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या परीक्षक पदी आहे.

मराठी अभिनेत्री आणि आता सध्या बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व गाजवणारी सई ताम्हणकर चर्चेत आहे.

सई अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असते आणि ती स्वतःचे फोटो देखील शेअर करताना दिसत असते.

अभिनेत्रीने नुकतेच तिचे नवे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

या फोटोला चाहते भरभरून प्रतिसाद देखील देत आहे. तसेच आता सई ताम्हणकर लवकरच बॉलिवूड चित्रपट Ground Zero मध्ये अभिनेता इमरान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

सईने या शेअर केलेल्या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे. ज्यावर रंगीबिरंगी रंगाचे नक्षी काम केले आहे.

सईने परिधान केलेल्या या ड्रेसवर फुलांची डिझाइन खूपच मोहक दिसत आहे. तसेच या फोटोवर चाहते तिला भरभरून प्रतिसाद देत आहे.

सईने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल ड्रेसवर गोल्डन रंगाचे मोठे इअरिंग घातल्या आहेत. तसेच केसांची हेअरस्टाईल आकर्षित केली आहे.