हुमा कुरेशीने 'महाराणी', 'लीला', 'तरला' यांसारख्या मालिका आणि चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

२००८ मध्ये ती दिल्लीहून मुंबईत आली. प्रचंड संघर्षानंतर आणि अनेक ऑडिशन्स देऊन त्यांनी टीव्ही जाहिरातीपासून सुरुवात केली.

त्यानंतर तिने अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर'मधून पदार्पण केलं.

हुमा कुरेशीचं नावही सोहेल खानशी जोडलं गेलं होतं. असे म्हटलं जातं की जेव्हा २०२२ मध्ये सोहेल खान आणि सीमा सजदेह यांचा घटस्फोट झाला तेव्हा अभिनेत्याचं नाव अभिनेत्रीशी जोडलं जाऊ लागलं. दोघेही डेट करत होते आणि हुमामुळेच त्यांचा घटस्फोट झाल्याचे बोललं जात होतं.

हुमाने नुकतेच तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

ज्यात ती ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

तिचा हा हटके लूक रेट्रो वाईब देत आहे.

यातील तिचा मेकअप खूपच वेगळा आणि सुंदर आहे.