स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून अभिनेत्री रुपाली भोसले प्रसिद्धीझोतात आली.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

रुपालीने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटसाठी रुपालीने निळ्या रंगाची सिल्क साडी नेसली आहे.

रुपालीने साडीतील फोटोशूटला ‘#RupaliBhosle #PositiveVibes #LifeIsBeautiful #Friday #InstaPic’ असे हॅशटॅग दिले आहेत.

रुपालीने आतापर्यंत हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. सोनी टिव्हीवरील सुमित राघवनसोबतची तिची बडी दूर सें आये हैं ही मालिका विशेष गाजली.

या मालिकेतून ती हिंदी मालिकाविश्वातही सक्रिय झाली होती. तसेच अनेक मराठी मालिकांमधूनही रुपालीला पसंती मिळाली होती.

पण आई कुठे काय करते या मालिकेमुळे रुपालीला विशेष पंसती मिळाली.

दरम्यान रुपाली ही याआधी बिग बॉस मराठीमध्ये देखील झळकली होती.