महाराष्ट्राची अप्सरा म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची ओळख आहे.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

सोनालीने नुकतचे तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

गाढवाचं लग्न, आबा झिंदाबाद, हाय काय नाय काय, समुद्र, सा सासूचा, इरादा पक्का, गोष्ट लग्नाची, क्षणभर विश्रांती, नटरंग, अजिंठा, झपाटलेला 2, रमा माधव, क्लासमेट्स, मितवा, शटर, पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, तुला कळणार नाही, हम्पी, ती आणि ती, हिरकणी, विकी वेलिंगकर ही सोनालीच्या मराठी सिनेमांची भलीमोठी यादी.

मराठीच नव्हे तर 'ग्रॅण्ड मस्ती' आणि 'सिंघम रिटर्न्स' या हिंदी सिनेमांमध्येही सोनालीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

सोनालीचा जन्म पुण्याच्या मिलिट्री हॉस्पिटलमध्ये झाला. तिचे वडील मनोहर कुलकर्णी लष्करात डॉक्टर होते आणि आईही लष्करातच नोकरी करत होती.

सोनालीचे शिक्षण आर्मी स्कूल, केंद्रिय विद्यालयातून झाले. त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला.

सोनालीने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय ज्यात ती काळ्या आऊटफिट्समध्ये दिसतेय.

न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाईलमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.

सोनालीचे इन्स्टा वर 1.9M फॉलोवर्स आहेत.