अदितीनं दशकभराच्या अभिनय कारकिर्दीतून मनोरंजनसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

तिच्या अभिनयासोबत अदितीच्या सौंदर्याबद्दलही बोललं जातं.

अदिती राव हैदरीनं २००६मध्ये प्रजापती या मल्याळम सिनेमातून सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.

हा साऊथ स्टार ममूटीचा सिनेमा होता. तर २०११मध्ये तिनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

पण बॉलिवूड सिनेमांमध्ये तिला मुख्य भूमिका न मिळता, सहाय्यक भूमिकाच जास्त मिळाल्या.

अदिती राव हैदरी हिचा जन्म शाही कुटुंबात झाला आहे. अदिती मूळची हैदराबादची आहे. अदितीचे पणजोबा अकबर हैदरी हे हैदराबाद संस्थानाचे मुख्य होते.

इतकंच नाही तर आदिती ही मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची भाची आहे. जे आसामचे माजी राज्यपाल होते. तर अदितीचे आजोबा, राजा जे. रामेश्वर राव यांनी तेलंगणातील वानापर्थीवर राज्य केलं आणि हैदराबादचे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ शांता रामेश्वर राव ओरिएंट ब्लॅकस्वन पब्लिशिंग हाऊसचे अध्यक्ष होते.

अदितीने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केलाय ज्यात तिने जांभळ्या रंगाची साडी नेसलीये, यात ती खूपच सुंदर दिसत आहे.