रिंकूचे वडील वडील महादेव राजगुरू यांनी रिंकूच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत
आणि आपल्या भावी जावयाच्या अपेक्षा सांगितल्या आहेत...

रिंकू जो मुलगा आपला जोडीदार म्हणून ठरवेल तो चालेल.

पण तिने सांगितल्यावर आम्ही त्यावर निर्णय घेऊ असे,

रिंकूचे वडील महादेव राजगुरू यांनी सांगितले.

मात्र, मला हा मुलगा आवडतो असे तिने सांगितल्यावर

आम्ही लग्नासाठी तात्काळ होकार देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही रिंकूला ज्या प्रमाणे स्वातंत्र्य दिले आहे, त्याचप्रमाणे मुलानेदेखील तिला स्वातंत्र्य द्यावे.

तू इकड जाऊ नकोस, तिकडे जाऊ नकोस अशी बंधने तिच्यावर नको

रिंकू काम करत असलेले क्षेत्र असे आहे की तिला प्रत्येक ठिकाणी जाव लागत आहे.

या गोष्टी ज्या मुलाला समजतील तोच मुलगा तिला समजून घेऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.

रिंकूसाठी असा मुलगा असेल तर आम्हाला काहीच हरकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.