बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री प्रियंका!
बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री दीपिका पादुकोण किंवा आलिया भट्ट असेल असं काहींना वाटतंय.
पण बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रीच्या नावावर 'देसी गर्ल' प्रियंका चोप्राने आपलं नाव कोरलं आहे.
फोर्ब्सच्या एका रिपोर्टनुसार,'देसी गर्ल' आपल्या प्रत्येक प्रोजेक्टचे 40 कोटी रुपये चार्ज करते.
हॉलिवूडमध्ये काम केल्याने प्रियंका चांगलच मानधन घेते.
प्रियंका हॉलिवूडमधून $5 मिलियन कोटींची कमाई करते.
प्रियंकाने नुकत्याच आलेल्या 'सिटाडेल' या वेबसीरिजसाठी एवढं मानधन घेतलं होतं.
भारतात एका चित्रपटासाठी प्रियंका 14-20 कोटी रुपयांचं मानधन घेते.
बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे.
आपल्या कामाच्या माध्यमातून या अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या आहेत.