लियाम पायने याचा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स येथील हॉटेलच्या बाहेरून लियाम याचा मृतदेह सापडला आहे.
वयाच्या 31 व्या वर्षी लियामने अखेरचा श्वास घेतला.
लियाम ड्रग्सच्या प्रभावाखाली होता, असं सांगितलं जात असून,
त्यामुळेच त्याचा तिसऱ्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मिळालेल्या माहितीप्रमाणे अर्जेंटिनामधील एका हॉटेलच्या बाहेर लियाम पायनेचा मृतदेह आढळून आला.
इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून त्याचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
लियाम ड्रग्सच्या नशेत असताना तोल जाऊन तो इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला.
या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.