बॉलीवूडच्या प्रतिष्ठित अभिनेत्यांपैकी एक असणारा आमिर खान बॉक्स ऑफिसवर लागोपाठ चांगले सिनेमे देण्यासाठी ओळखला जातो. 2008 मध्ये प्रदर्शित झालेला गजनी सिनेमा सध्या चर्चेत आलाय त्याच्या सिक्वेलच्या बातमीनं.. आमिर खान आता गजनीचा सिक्वेल काढणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. अद्याप त्यांनं गजनीच्या सिक्वेलची घोषणा केली नसली तरी निर्माता अल्लू अरविंद सोबत गजनीची फ्रेंचाईजी बनवण्याबाबत चर्चा करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार आमिर खानने अल्लू अरविंद मधुमंटेना आणि संपूर्ण टीमला गजनी 2 साठी विषय घेऊन येण्यास सांगितल्याचं कळतंय. आमिर खानला सध्या गजनी 2 साठी चांगल्या स्क्रिप्टची प्रतीक्षा आहे. या सिनेमाच्या लोकेशनलाही नेक्स्ट लेवल नेण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येतंय. मीडिया रिपोर्टनुसार सध्या कल्पनाच कॅरेक्टर डेव्हलप होत आहे.