कलाक्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीतील सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. त्यांच्यासोबत काम केलेल्या सहकाऱ्यांसह दिग्गजांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. दादर मधील शिवाजी पार्क हिंदू स्मशानभूमी त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अतुल परचुरे यांचे पार्थिव दाखल होताच अनेकांना अश्रू अनावर झाले होते. कॅन्सरचे कारण झालं आणि आपल्या प्रांजळ अभिनयाने लोकांचा मनाचा ठाव घेणारा अभिनेता अतुल परचुरे याने जगाचा निरोप घेतला. बालमोहन विद्यामंदिर चे माजी विद्यार्थी असलेल्या अतुल परचुरे यांचे संपूर्ण वास्तव्य हे शिवाजी पार्क परिसरातच राहिलं होतं. शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत त्यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या जवळचे असणारे कलाकार आप्तेष्ट आणि सहकारीही यावेळी उपस्थित होते. इतकी वर्ष सहवास लाभल्यानंतर अतुल परचुरे यांचं पार्थिव पाहून अशोक मामांसह सुचित्रा बांदेकर, निवेदिता सराफ, मिलिंद जोशी असे कलाक्षेत्रातील अनेक दिग्गजांना गलबलून आले होते.