बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच कधी वादग्रस्त वक्तव्याने तर कधी विनोदी वाक्यांनी चर्चेत राहिलेले वकील गुणरत्न सदावर्ते नुकतेच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याची चर्चा आहे. उच्च न्यायालयातील एका प्रलंबित केसमुळे त्यांना बाहेर पडावे लागल्याचं समजतंय. याविषयीची सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. मराठा आरक्षणाची सध्या न्यायालयात केस सुरू असून गुणरत्न सदावर्ते त्यांनी आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र सुनावणीला ते गैरहजर राहिल्याने हायकोर्टाने विचारले असता इतर वकिलांनी ते बिग बॉस मध्ये जाऊन बसले असल्याची माहिती दिली. यावर हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे खटला सुरू असताना सदावर्त एक बिग बॉसच्या घरात कसे जाऊ शकतात असा सवाल केला जात आहे.