नाच गं गुमा हा चित्रपट सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे.
या सिनेमाला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींसोबत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला
या सिनेमाने आत्तापर्यंत 2 कोटींच्या वरती कमाई केली आहे.
सध्या या सिनेमाचे सर्वत्र प्रमोशन सुरू आहे.
नाच गं गुमा या सिनेमाच प्रमोशन करताना एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
कारण हे प्रमोशन थेट टाइम्स स्क्वेअरवरून करण्यात आले.
न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर ही जागा प्रमोशनसाठी जगप्रसिद्ध आहे.
या व्हिडिओत मुक्ता बर्वे एका डिजिटल क्रिएटर बरोबर नाचताना दिसत आहे.
या व्हिडिओवर खूप सारे लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.