ओटीटीवरील काही वेब सीरिज दमदार कथानक आणि जबरदस्त कलाकारांच्या अभिनयामुळे चांगल्याच गाजल्या, त्यातीच एक म्हणजे मिर्झापूर वेब सीरिज. मिर्झापूर वेब सीरिज पहिल्या सीझनपासून अलिकडेच आलेल्या तिसऱ्या सीझनपर्यंत दमदार पटकथेनं प्रेक्षकांची भरभरुन दाद मिळवली. ही सीरिज चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. प्रसिद्ध मिर्झापूर वेब सीरिज आता नव्या रुपात प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वेब सीरिजचे निर्माते याचं चित्रपटात रुपांतर करण्याच्या तयारीत असून त्याच्या स्क्रिप्टवर काम सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही काळापासून, या सीरीजला चित्रपट रूपांतरित केले जात असल्याची चर्चा सुरा आहे. त्यातच आता अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या जागी अभिनेता हृतिक रोशनला कालिन भैय्याची भूमिका साकारताना दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. मिर्झापूरच्या चौथ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. दिग्दर्शक गुरमीत सिंह यांनी सांगितलं की, चौथा सीझन अद्याप लेखनाच्या टप्प्यात आहे. लेखक आगामी सीझनध्ये प्रेक्षकांना काहीतरी खास दाखवण्याची तयारी करत आहेत.