‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी घराघरांत लोकप्रिय झाली. अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राजक्ताचा फुलवंती हा सिनेमा येत्या 11 ऑक्टोबरपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच या सिनेमाचं शिर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. आर्या आंबेकर हिच्या आवाजात हे गाणं संगीतबद्ध करण्यात आलं आहे. ‘फुलवंती’ चे अस्मानी सौन्दर्य आणि आणि मनमोहक नृत्यकला ह्यांचे दर्शन आपल्याला ‘फुलवंती’ ह्या शीर्षकगीतातून होणार आहे. गीतकार वैभव जोशी, विश्वजित जोशी आणि स्नेहल तरडे ह्यांच्या लेखणीतून साकारलेले हे गीत आर्या आंबेकर हिच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आले आहे. ‘फुलवंती’ हा संगीतप्रधान ऐतिहासिक चित्रपट असून ह्या चित्रपतील सर्वात महत्वाची भूमिका ही संगीतदिग्दर्शकाची होती. गाण्यांमध्ये असणारी भव्यता, नजाकत, तो काळ आणि सुमधुर संगीत ह्यांचा मेळ साधणं हे एक मोठं आव्हान होतं. ‘फुलवंती'..शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात आपल्यासमोर अवतरणार आहे. पखवाज आणि घुंगरांची जुगलबंदी प्रेक्षकांना नक्की आवडेल ह्याची आम्हाला खात्री आहे.